जळगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यात परीक्षा देऊन घरी जात असलेल्या दोन तरुणांच्या दुचाकीस एसटी बसने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. नशिराबाद टोलनाक्याजवळ बुधवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला. यात रोशन मनोहर कोंगळे (वय 19, रा. झोडगा, ता. मलकापूर,जि. बुलडाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सुशिल विनोद मोरे (वय 19) हा जखमी आहे.
सुशिल व रोशन हे दोघे बुधवारी सकाळी झोडगा येथून जळगावात आले होते. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात परीक्षा असल्याचे कारण त्यांनी कुटुंबियांना सांगीतले होते. दरम्यान, परत जात असताना नशिराबाद टोलनाक्याजवळ समोरुन येणाऱ्या एका एसटी बसने दोघांच्या दुचाकीस धडक दिली. यात रोशन जागीच ठार झाला. तर सुशिल गंभीर जखमी झाला. सुशिलवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर रोशनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मृत रोशांच्या पश्चात आई, वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. आठ दिवसांपूर्वी याच स्पॉटवर ट्रकच्या धडकेत चार व्यापारी ठार झाले होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






