स्वत:ची हौस पूर्ण करण्यासाठी विवाहितेचा छळ
जामनेर :- सध्या महाराष्ट्रात विवाहितेचा छळ झाल्याचा घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच आपली हौस पुर्ण करण्यासाठी पतीने गाडी घेण्यासाठी पत्नीकडे 8 लाखांची मागणी केली. परंतू पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने सासरच्यांकडून तिला मारहाण करण्यात आली. असे असताना तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली. पत्नी रेखा यांनी सासरच्यांविरोधात तक्रार नोंदवली आसता. आज बुधवार रोजी कुटुंबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरात राहणाऱ्या रेखा संतोष उंबरकर (वय 36) यांचे लग्न ठाण्यात राहणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर उंबरकर यांच्याशी झाले. दरम्यान, संतोष उंबरकर यांना आता एक कार खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी पत्नी रेखा यांच्याकडे 8 लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान हा प्रकार 25 मे 2013 पासून जुलै 2022 पर्यंत घडला. रेखा यांच्या माहेरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्यामुळे पती संतोष, सासु सुनिता, सासरे ज्ञानेश्वर रुंजाजी उंबरकर यांच्यासह दीर, देराणी, नणंद, चुलत सासरे अशा सात जणांनी रेखा यांना जबर मारहाण केली. यावेळी रेखा यांचे आई-वडील भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही दमदाटी केली. पैसे दिले नाही, तर मुलीला घेऊन जा, आम्हाला घटस्फोट हवा आहे, अशी धमकी दिली. आपली स्वत:ची हौस पुर्ण करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याचे हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी रेखा यांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश महाजन पुढील तपास करीत आहेत.
या मागणीमुळे उडाली खळबळ
वेगवेगळ्या कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचार होत असल्याची समाजात उदाहरने आहेत. दरम्याम, उंबरकर कुटुंबियांनी चक्क स्वतःच्या मौज मजेसाठी कार घेण्याचे ठरवले. त्यासाठी सुनेकडून पैसे मागितले. या अजब कारणामुळे खळबळ उडाली आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






