झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर :- (जि. पुणे) आषाढी वारी निमित्त पुरंदर हवेलीचे आमदार संजय भाई जगताप संत सोपान काका महाराज पालखी सोहळा दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते सर्व वारकरी यांच्यासाठी अल्पोहार, फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी लुमेवाडी गावचे नेते नासिर भाई शेख.. अध्यक्ष इंदापूर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक कमिटी यांच्या शब्दाला मान देऊन आमदार साहेब लुमेवाडी येथे जोधपुरी बाबांच्या दर्शनासाठी आले असता आमदार साहेब यांनी दर्ग्याच्या बांधकामासाठी लागणारे एक लाख रुपये पर्यंतचे मार्बल आणि ग्रॅनाईट देण्याची घोषणा केली.
यावेळी दर्गा बांधकाम कमिटी तर्फे दर्गा बांधकाम खिदमतगार सत्तार भाई शेख यांचे चिरंजीव आसिफ भैया शेख यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील भैय्या सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकीर भाई काझी, इंदापूर शहर अध्यक्ष चमणभाई बागवान, किसान सेल अध्यक्ष संतोष होगले, अल्पसंख्याक अध्यक्ष नासिर भाई शेख,अनुसूचित जाती व जमाती अध्यक्ष युवराज गायकवाड,
संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य महादेव लोंढे, ओबीसी सेल उपाध्यक्ष आकाश पवार, श्रीनिवास पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.






