दुर्दैवी घटना ! एक वर्षीय बालक शिवकाशचा डंपरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू –

Spread the love

प्रतिनिधी । राहुल इंगळे जामनेर :- तालुक्यातील हिवरखेडे येथील परिसरात रोडच्या कामासाठी आलेल्या पावरा समाजाच्या कुटुंबातील एका १ वर्षीय मुलाचा कामावरच वाहतूक करणाऱ्या डंपरच्या चाकाखाली आल्याने जागेवरच म्रुत्यु झाल्याची घटना काल दि.६ रोजी दुपार नंतरच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर असे की हिवरखेडे येथे रोडचे काम चालु असुन. त्या कामावर मध्य प्रदेशातील पाडल्या ता.जिरवरे जि.खरगोन येथील आकाश डावर हा कामगार देखील आपल्या कुटुंबासोबत कामासाठी संबधीत ठेकेदाराकडे आलेला आहे.आज दुपार नंतरच्या दरम्यान काम चालु असताना.कामावरील डंपर चालकाकडुन आपल्या ताब्यातील डंपर (एम.एच.१९- झेड- २९२१) तिथेच असलेला आकाश डावरचा मुलगा शिवकाश(वय-१ वर्ष) याचा अंगावरून दोनदा गेले.

त्यात शिवकाशचा जागीच म्रुत्यु झाला.शिवकाशचा अंगावरून पहिल्यांदा डंपरचे चाक गेले. तेव्हा त्याच्या जोरात किंचाळण्याने चालकाने आवाजाने घाबरून पुढे नेलेले डंपर परत मागे घेतले.त्यामुळे शिवकाशच्या अगांवरून एकदा पुढे गेलेले डंपर परत मागे घेतल्यामुळे दुसऱ्यांंदा अंगावरून जावुन त्याचा जागच्या जागी म्रुत्यु झाला.

असे घटनेच्या प्रत्यक्षदर्शी नातेवाईकाने सांगितले.झालेल्या घटने विषयी प्रथम दर्शनी कुठे माहिती होणार नाही अशी काळजी घेतल्या गेल्याचे समजते.मात्र नंतर ह्या घटनेची माहिती पसरुन संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीम झुंजार