वंचित बहुजन आघाडीची एसटी महामंडळाकडे मागणी
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम
औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळाचे औरंगाबाद विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार आहे
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे यात्रा भरली नव्हती त्यामुळे या वर्षी हि यात्रा मोठया प्रमाणात भरण्याची शक्यता आहे या यात्रेसाठी आजुबाजुच्या ढोरेगाव, सावखेडा, कोडापुर झाझर्डी, पेडापुर, भोयगाव, पदमपुर, नरसापुर,दिघी,कनकोरी,मुरमी,शहापुर,गुरुधानोरा,माळवाडी,भगतवाडी,टेभापुरी,जिकठाण,तुर्काबाद, लिंबे जळगाव, लाझी,पिपरखेडा,शिवराई, नारायणपूर, वाळुंज अश्या गावातील भाविक छोटछोटया दिंड्या काढून पायी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात
पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर या भाविकांना गावाकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे ना विलाजाने खाजगी प्रवासी वाहतूकीचा आधार घेवा लागणार आहे या मुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होऊन आणि जीव धोक्यात घालून खाजगी वाहनातून असुरक्षित प्रवास करावा लागेल यासाठी आपल्या विभागाकडून पंढरपूर येथील कामगार चौकांत वाहतूक नियंत्रण कक्ष उभारून वरिल गावांसह वेगवेगळ्या गावातुन येणाऱ्या दिंड्या व या दिंड्याद्वारे आलेल्या भाविकांना त्यांचा गावात सुरक्षित नेउन सोडायची व्यवस्था एसटी महामंडळाने करावी महामंडळाने दिवसभर पंढरपूर ते ढोरेगाव या मार्गावर यात्रा स्पेशल बस चालवून भाविकांना सुरक्षित आपल्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने
एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्या कडे केली असून याप्रकरणी आषाढी एकादशी पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, औरंगाबाद पच्श्रिम तालुका अध्यक्ष अंजन साळवे, अँड सागर मोरे गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस पटेल, जिल्हा सदस्य सघराज धम्मकिर्ती,तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, तालुका उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य शेख हाशमभाई,माजी सरपंच काकासाहेब दाणे,
जिल्हा सदस्य मधुकर त्रिभुवन, हरिदास बोर्डे, गणेश खोतकर,तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव, वंचित बहुजन आघाडीचे लिंबे जळगाव ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, लिंबे जळगाव सर्कल प्रमुख सईदबाबा पठाण, वाळुंज जिल्हा परिषद सर्कल प्रमुख अरुण सातुरे, वाळुंज पंचायत समिती सर्कल प्रमुख अमोल जाधव, वाळुंज सर्कल महासचिव दिलीप आरक, तालुका सचिव कान्हु भालेराव,ता सदस्य संतोष भुजंग, माजी ग्रामपंचायत सदस्य शेख राजुभाई,शेख शमशोद्दीनभाई, सय्यद इस्माईल पटेल,मगन गाडेकर, संजय गायकवाड, नंदकुमार गाडेकर, काकासाहेब त्रिभुवन, रमेश गाडेकर,प्रदिप गायकवाड, सुनील गाडेकर सह आदींचे नांवे आहेत
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






