झुंजार। प्रतिनिधी
कासोदा:- येथून जवळच असलेल्या उत्राण गु.ह. येथील संतोष माधवराव सोनोने (७३) यांनी दि. ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी घराच्या छतास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु घरात मिळालेल्या सुसाईट नोट वरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल उत्राण अ.ह येथील तिन जणांवर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उत्राण अ.ह. येथील व भिकन मोहन कोळी, मालूबाई भिकन कोळी व ज्ञानेश्वर भिकन कोळी यांनी संतोष माधवराव सोनोने यांच्याशी शेती जमीन हिस्से वाटणीवरुन वाद करून मारहाण व शिवीगाळ त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी संतोष सोनोने यांच्यावर वेळोवेळी पाळत ठेवून होते.
मयत संतोष माधवराव सोनोने यांनी लिहून ठेवलेल्या पाच पानी सुसाईट नोट ही फिर्यादी यांनी कासोदा पोलीसांना दिली आहे. सदर आरोपींच्या त्रासाला कंटाळून दि.३ जुलै २०२२ रोजी संतोष माधवराव सोनोने यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संतोष कोळी यांच्या मुलाने कैलास संतोष सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
भिकन मोहन कोळी, मालूबाई भिकन कोळी व ज्ञानेश्वर भिकन कोळी यांच्या विरोधात भाग ५ सी. सी. टी. एन. एस. ००७७/२०२२ , भा.दं. वि. कलम ३०६,३४ प्रमाणे कासोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायते हे करीत आहेत.






