दिल्ली :- सध्या देशात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदार करत असतानाच एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप केंद्रीय नेतृत्व एका माजी शिवसैनिकाला उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचे समजते.
असं झाल्यास भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धोबीपछाड मिळेल. कारण शिवसेनेने साथ सोडूनही भाजप जुन्या शिवसैनिकांना विसरलं नसल्याचा संदेश शिवसेना कार्यकर्त्यांपर्यंत जाऊ शकतो. शिवसेनेत सध्या उभी फूट पडलेली असताना याचा परिणाम आगामी निवडणुकांवर देखील पाहायला मिळू शकतो. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी सध्या चर्चेत आले आहे.
सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे खात्याची जबाबदारी सांभाळली होती. प्रभू मूळचे शिवसेनेचे नेते, पण मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अगदी ऐन वेळी त्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आले. प्रभू अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. हाच अनुभव आणि जेष्ठत्व यामुळे भाजप त्यांच्या नावाचा विचार करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
प्रभू यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. गुरुवारी रात्री घेतलेल्या या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. अमित शाह आणि सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाली असून उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव पुढे येऊ शकते अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरु आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






