लागा तयारीला : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील 9 नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी!

Spread the love

जळगाव : – राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे. पर्जन्यमान कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुका घेण्यात येतील, असं राज्य निवडणुका आयोगाने म्हटलं आहे.

आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं. त्यानुसार येत्या 18 ऑगस्ट रोजी राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींमध्ये निवडणुकांसाठीचं मतदान होईल.

राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्यानुसार राज्यात ९२ नगरपालिकांची निवडणूक होणार असून यात जळगाव जिल्ह्यात ९ नगरपालिकांचा समावेश आहे. यामुळे या नगरपालिकांची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरीषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. यात १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या एकूण नऊ नगरपालिकांचा समावेश आहे. यातील भुसावळ ही अ वर्गातील, अमळनेर आणि चाळीसगाव या ब वर्गातील तर अन्य क वर्गातील नगरपालिका आहेत. तर जिल त अन्य नगरपालिकांचे मतदान पुढील टप्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नगरपालिकांसाठी २२ ते २८ जुलै २०२२ च्या दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. यानंतर २९ रोजी छाननी होऊन ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दिनांक १८ रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आता नऊ ठिकाणी रणधुमाळीस प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक?

  • नाशिक
  • धुळे
  • नंदुरबार
  • जळगाव
  • अहमदनगर
  • पुणे
  • सोलापूर
  • सांगली
  • सातारा
  • कोल्हापूर
  • औरंगाबाद
  • जालना
  • बीड
  • उस्मानाबाद
  • लातूर
  • अमरावती
  • बुलडाणा

हे वाचलंत का?

टीम झुंजार