पाळधी (धरणगाव ) : – पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी या ठिकाणी जपानचे पंतप्रधान स्वर्गीय श्री शिंजो अबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्तीप्राप्त अशा,बुलेट ट्रेनच्या विकासाबाबत अतुलनीय योगदान देणाऱ्या स्वर्गीय श्री शिंजो अबे यांच्या स्मृतींना प्राचार्य श्री सचिन पाटील यांनी उजाडा दिला.
मुस्लिम धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या बकरी ईद सणाचे अनोखे साजरीकरण शाळेमार्फत करण्यात आले, विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनी देखील मुस्लिम समाजाची वेशभूषा परिधान करून शाळेत उपस्थिती दर्शवली, हुस्ना पटेल मॅम व सलमान शेख सरांनी विद्यार्थ्यांना ईद विषयी अधिक माहिती सांगितली, अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रार्थना व कथानकांचे सादरीकरण केले.
शाळेतील शिक्षिका सौं.आरती पाटील यांनी लबपे आती है दुवा बनके तमन्ना मेरी.. ही नाथ अर्थासह सादर केली. पांढरा कुर्ता पायजमा, त्यावर सापा अशा वेशभूषित असलेल्या विद्यार्थ्यांनी जीपीएसचे प्रांगण बहरून आले होते.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष, युवकांचे प्रेरणास्थान,जळगाव जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री. प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील उपस्थित होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बकरी ईदच्या व देवशयनी आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली.
हिंदू मुस्लिम सिख ईसाई
आपसमे है भाई भाई
अशा सर्वधर्मसमभाव व्यक्त करणाऱ्या घोषणांनी जीपीएसचा परिसर दणाणून निघाला.
सदर कार्यक्रमाला भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री सचिन पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक वर्ग उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






