धक्कादायक ; मतिमंद मुलीला घरात जबरदस्ती नेत केला बलात्कार, नराधम नात्यातीलच

Spread the love

मुक्ताईनगर :- राज्यासह जिल्ह्यात महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या काही होताना दिसत नाहीय. आरोपींना कायदाच धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. त्यामुळे अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. दरम्यान, अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना 9 रोजी घडली आहे. दुपारी दोन वाजता मतिमंद मुलीचे आई वडील शेतात गेल्याची संधी साधत आरोपीने मतिमंद मुलीला शेजारच्या घरात नेत जबरदस्तीने बलात्कार करून पसार झाला होता मुलीच्या आई वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलीने मुलीने इशारा करून सर्व हकीकत सांगितले ऐकताच आई वडिलांना धक्काच बसला.

काय करावे कुठे जावे पूर्ण कुटुंब चिंतेत पडले आरोपी हा नात्यातीलच असून नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. अखेर पोलीस स्टेशन गाठत रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून जलद गतीने तपास चक्र फिरवून रात्री साडेतीन वाजता आरोपीला अटक करण्यात आलेली असून आरोपीविरुद्ध भादवी कलम 376, 376 (2)( एल ),376 ( 2)( जे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर करत आहे

टीम झुंजार