मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे राजकीय नेते एकमेकांनवर आरोप प्रत्यारोप करत आहे अश्यातच गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली. पादत्राणे हातात घेऊनच मते मागितली !’ अशा शब्दांमध्ये आमदार एकनाथराव खडसे यांनी आ. गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही माजी मंत्र्यांमधील अलीकडच्या काळात आलेले वितुष्ट हे जगजाहीर आहे. दोन्ही मान्यवर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच खडसे हे आमदार बनल्यानंतर लागलीच राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडल्यामुळे सोशल मीडियात खडसे विरोधकांनी पंगतीत बसले आणि बुंदी संपली अशी त्यांची खिल्ली उडविली होती.
याचाच धागा धरून आ. गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर टिका करतांना ते मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, तर बाहेर आले आणि चप्पल हरवली अशी खिल्ली उडविली होती. यावरून सोडल मीडियात उलट-सुलट चर्चा सुरू असतांनाच आमदार एकनाथराव खडसे यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, गिरीश महाजन बालिश आहेत, प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली, आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष असतं. पण, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टिकास्त्र सोडले.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४