झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- येथील म्हसावद रस्त्यावरील दादासाहेब पाटील महाविद्यालय ते विखरण फाटा या रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.सदर रस्त्यावर खडीचा कच टाकून त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा विद्यार्थीआणि विद्यार्थिनी यांचेसह रास्तारोको आंदोलन करण्यात येईल
असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,तालुका सरचिटणीस अमोल जाधव व पदाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ऊप अभियंता याना दिलेल्या निवेदनात दिला आहे.भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,की म्हसावद नाक्यापासून विखरण फाट्यापर्यंत रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.याच रस्त्यावर दादासाहेब पाटील महाविद्यालय असून हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयात नियमित पणे शिक्षणासाठी येत असतात.
रस्त्यावर चिखल असल्यामुळे विद्यार्थिनींना चालतांना मोठी कसरत करावी लागते.चिखलावरून पाय घसरून विद्यार्थिनी पडल्यास तिची रोडरोमीओंकडून टिंगल टवाळी करण्यात येते.रस्त्यावरील चिखलावरून अनेक दुचाकीस्वार वाहन घसरून पडले आहेत.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे या रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वाहन चालकांकडून वापर केला जातो.
भरदाव वेगाने जाणारे वाहन चालक पायी चालना-यांवर चिखल उडवत असल्यामुळे विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.याठिकाणी असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालय आणि बालशिवाजी प्राथमिक विद्या मंदिरातील लहान विद्यार्थ्याना जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पालक वर्गात देखील चिंता व्यक्त केली जात आहे.याबाबत विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून रस्त्याची त्वरित दुरुस्ठी करण्यात यावी अथवा रस्त्यावरील खड्डे बुजून त्यावर खडीचा कच टाकण्यात यावा अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.







