झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम
वालचंद नगर : ( ता. इंदापूर ) वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक २०२१-२२ ते २०२६-२७ ची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया अंतर्गत दिनांक ९ जुलै २०२२ रोजी मतदान झाले असून स्वाभिमानी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार यांचा दणदणीत विजय झाला आहे असे पॅनल प्रमुख संजय नकाते यांनी माहिती देताना सांगितले.
स्वाभिमानी सहकारी पॅनल हे भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रचार प्रमुख संजय नकाते यांच्या नेतृत्वाखाली वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक निवडणुकीच्या रणधुमाळीत एकूण १२-० उमेदवार कपाट या चिन्हावरती विजय झाले.
स्वाभिमानी सहकारी पॅनलचे विजय उमेदवार खालील प्रमाणे:
सर्वसाधारण मतदार संघ
१) संतोष हनुमंत गायकवाड२) विठ्ठल नामदेव चव्हाण३) शरद अर्जुन चव्हाण४) संदीप परशुराम फाळके५) संजय नारायण भरते ६) शशांक सुधाकर माडगे ७) राजेंद्र सूर्याजी रणमोडेभटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग८) विजय शिवाजी अर्जुन इतर मागास प्रवर्ग ९) विजय सोपान मस्केअनुसूचित जाती जमाती प्रवर्ग १०)जीवन लक्ष्मण भोरे महिला प्रतिनिधी
११)सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी १२) सौ पार्वती गोविंद बनसोडे.
वालचंदनगर चे उपसरपंच व पॅनल प्रमुख श्री संजय नकाते व सर्व विजयी उमेदवार यांचे राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी सत्कार केला . हर्षवर्धन पाटील साहेब पुढे म्हणाले येणाऱ्या काळात कामगारांचे प्रश्न असतील तर ते सोडवण्यात प्राधान्याने सोडवले जातील.बँकेच्या कामात काही अडचण असल्यास त्या देखील सोडवण्यात येईल असे नमूद केले.
दोन पंचवार्षिक निवडणुकीत सर्व कामगार व शिक्षक बंधू यांनी भाजप प्रणित भारतीय मजदुर संघ यंच्यावर्ती विश्वास दाखवला ह्या बद्दल वालचंदनगर चे उपसरपंच व पॅनल प्रमुख श्री संजयजी नकाते यांनी सर्वांचे आभार मानले
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






