राज्यव्यापी पॅंथरचा महासन्मान महामेळावा थाटात संपन्न

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम
जंक्शन : ( ता. इंदापूर)
अतिशय देखने व भव्य नियोजन
महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित
१२ दिग्गज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील गायकांची उपस्थिती
पावसामुळे व्यत्यय तरीसुद्धा एवढ्या उशीरा रात्रीपर्यंत महिलांची लक्षणीय उपस्थिती

ऐक्यासाठी मी सदैव तयार….-प्रा.जोगेंद्र कवाडे सर
प्रा.कवाडे सरांनी उपस्थित केलेले मुद्दे – १) पॅंथरने अन्याय अत्याचार करणाऱ्याचा प्रतिकार करण्याची दिक्षा दिली….२)हा कार्यक्रम ,मेळावा नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा कार्यक्रम आहे…३) ऐक्याच्या मांडवात कोणी येत नाही.अहंकार बाजूला ठेवून एक नेता ठरवा…..४) पॅंथर होता तर दरारा होता…५)माता भगिनींनी त्यांच्या कुशीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक स्वातंत्र्य जिंकण्यासाठी एक पॅंथर द्यावा.

दिपकजी केदार व वैभवजी गिते यांनी आक्रमण पणे त्यांच्या शैलीत आंबेडकरी चळवळीवर भाष्य केले
“मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यव्यापी पॅंथरचा महासन्मान महामेळावा शनिवार दि.९ जुलै २०२२ रोजी रोहित मंगल कार्यालय, जंक्शन येथे संपन्न झाला.यावेळी या महासन्मान महामेळाव्याला पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर हे अध्यक्ष म्हणून लाभले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपकभाई केदार,एन डी एम जे चे राज्य सचिव वैभवजी गीते, जेष्ठ पॅंथर नेते दादासाहेब धांडोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विक्रम शेलार, साहित्यिक सुभाष वाघमारे, जेष्ठ पॅंथर सु.ग.साबळे,प्रा.अरूण कांबळे, जेष्ठ पॅंथर विनायक लोंढे, कळंब चे सरपंच विद्याताई अतुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, जेष्ठ विकासदादा धाईंजे,

प्रमोद शिंदे, संजयजी खडसे,पुंडलिक सोनवणे सर,आतिश मिसाळ, निलेश लोंढे, निलेश खरात, विकास गायकवाड, विजय डॅडी सोनवणे , संजयजी खडसे, अजितजी ठोकळे, पोलीस पाटील वर्षां गायकवाड, नवनाथ भागवत, सरपंच अतुलजी सावंत, विशालजी साळवे, शामराव भोसले, रणजित कसबे, अतुल काटे , भागवत लोंढे हे उपस्थित होते

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.यावेळी मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी प्रास्ताविक केले तर विशालजी साळवे यांनी सुत्रसंचलन केले.प्रा. डॉ.अरूण कांबळे,दिपक केदार, वैभव गिते व प्रा.कवाडे सर यांची भाषणे झाली.त्यानंतर गायक कलाकारांनी आपल्या गितांच्या माध्यमातून प्रबोधन केले. विजय सरतापे, राजेंद्र कांबळे,राखी चवरे, राधा खुडे,प्रज्ञा कांबळे, शिवाजी कांबळे, वैभव खुणे, राहुल क्षिरसागर,अमर पुणेकर,राम जानराव व इतर कलाकार उपस्थित होते.

सकाळ पासुनच पाऊसाची रिमझिम सुरू होती.ऐन कार्यक्रमाच्या वेळी पाऊस नेमका वाढला.त्यामुळे तात्काळ कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी हलवावा लागला. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून दोन महिने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, राज्य सचिव अनिल केंगार, नागेश भोसले, आप्पा कदम, दत्तात्रय राक्षे, प्रविण लोंढे,अजय फले, क्षितीज वनसाळे, बुध्दभुषण राक्षे, सौरभ धनवडे, राहुल गायकवाड,बबलु वंचाळे,शिल्पा भोसले, योगिता भोसले, दिपाली शिंदे,माया चितारे, अनिता कांबळे, रूक्मिणी चव्हाण यांनी प्रयत्न केले.

आपण हे वाचले का?

टीम झुंजार