चोपडा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश

Spread the love

अमळनेर । प्रतिनिधी (युवराज पाटील ):-आम आदमी पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने विश्रामगृह येथील आम आदमी पार्टीत नवनिर्वाचित सदस्यानी जाहीर प्रवेश करून आम आदमी पार्टीचे सदस्यत्व घेऊन, येणाऱ्या जि प, पं स, न प निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी वर्तवली.आपल्या मनातली इच्छा जागृत करून सांगितले की आज पर्यंत आम्हाला भूतो ना भविष्य कोणीही मानसन्मानाची भूमिका न देता

आमचा फक्त इतर पार्टींनी आमचा वापर करून घेतला.असे नव्याने जुळलेल्या सदस्यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त करताना सांगितले. आम आदमी पार्टी चोपडा तालुका यांच्यावतीने जळगाव जिल्हा संयोजक, तुषार निकम सरांनी संबोधित करताना सांगितले की,

आम आदमी मध्ये तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मानसन्मानपूर्वक वागणूक देऊन, त्यांना चांगल्या प्रकारे समाजात मुख्य प्रवाहात व राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. कारण,आपली पार्टीच आम आदमी साठी आहे.असेही जिल्हा संयोजकांनी चोपडा आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्रामगृहातील मीटिंगमध्ये सांगितले

सर्वांनी चांगल्या प्रकारे भरभरून आम आदमी पार्टीच्या ध्येय धोरणांवर समाधानही व्यक्त केलं.शेतकरी नेते श्री शिवाजी दौलत पाटील व श्री संतोष बाबुराव पाटील तालुका संयोजक अमळनेर यांनी पार्टी संघटनावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विठ्ठलराव साळुंखे आणि रहीस खान यांनी केले.

आपण हे वाचले का?

टीम झुंजार