सध्या पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात कुठेही पिकनिकला गेल्यानंतर रेन डान्स हा प्रकारही आपल्याला बघायला मिळतो. पाण्यात भिजत नाचण्याचा आनंद लुटणं हे खूपच मजेशीर आहे. आपल्याला हवा तसा डान्स तर आपण करतोच. आतापर्यंत तुम्ही लग्नात नागिन डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या जो नागिन डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय तो कोणत्याही लग्नातला नव्हे तर नागिन हॉर्नवरचा डान्स आहे. हे वाचून तुम्हाला सुरूवातीला विचित्र वाटेल, पण हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःला हसू आवरणं कठीण होऊन जाईल. तरूणांनी केलेला हा नागिन हॉर्नवरचा डान्स जीवघेणा ठरू शकला असता.
हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असलात तरी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, हे मात्र नक्की. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या डान्सला तुम्हा साधा सुधा डान्स समजू नका. कारण या व्हिडीओमध्ये मुलांनी असा डान्स केलाय , जो तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला फार मजा येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरूण पावसाचा आनंद घेत बाईकवरून एकामागोमाग येत असतात. त्यांच्या मागून एक ट्रक देखील येताना दिसत आहे. अचानक हे सगळे तरूण आपआपल्या बाईक थांबवून रस्त्यावर उतरतात. मागून आलेला ट्रक चालक आपल्या ट्रकचा नागिन हॉर्न वाजवतो. हे ऐकून सगळेच तरूण या नागिन हॉर्नवर ठेका धरून भररस्त्यात नाचू लागतात. या गाण्यावर तरूण किती विचित्र डान्स करत आहेत हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. सुरूवातीला असा डान्स पाहून मनात विचार येईल की या मुलं किती विचित्र डान्स करतायेत? यांच्या डान्सला काही अर्थ आह का ? असंच तुम्हाला वाटत असणार. काही तरूण तर रस्त्यावर लोळून लोळून डान्स करताना दिसत आहे. जणू काही ट्रकचा नागिन हॉर्न ऐकताच सर्व तरूणांमध्ये नागिन संचारू लागते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नाशिकमधला आहे. नाशिकमधल्या त्र्यंबकेशवरमधील रस्त्यावर हा प्रकार घडला. यावेळी रस्त्यावरील काही प्रवाश्यांनी याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये काही तरूणांनी मद्यप्राशन केल्याचंही दिसून येतंय. रहदारीच्या रस्त्यावर अशाप्रकारे डान्स करणं हे जीवघेणं ठरू शकतं. रस्त्यावर अशा प्रकारे डान्स करून जीव धोक्यात येऊ शकतो, असं सांगून लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. काही युजर्सनी तर या प्रकारावर संताप व्यक्त करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






