जळगाव पोलिसांची मोठी कारवाई ; निर्दयीपणाचा कळस! स्कॉर्पिओचा दरवाजा उघडताच सगळे हादरले.

Spread the love

बापरे ! चक्क स्कॉर्पिओमधून गुरांची वाहतूक.

जळगावमध्ये पोलिसांनी(Jalgaon police) केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. इथे एका स्कॉर्पिओवर(Scorpio) कारवाई करण्यात आली असून यामध्ये असं काही समोर आलं की तुम्हीही हादराल. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर…

जळगाव : – जळगाव पोलिसांनी(Jalgaon police) केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खरंतर, पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी गुरांची वाहतूक करण्यासाठी नवनवीन वाहनांचा वापर करण्यासह शक्कल लढविल्या जात असतात. अशाच प्रकारे जळगाव शहरात चक्क स्कॉर्पिओमधून गुरांची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

स्कॉर्पिओ मध्ये कोंबुन ठेवलेले गुर

जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ या वाहनावर सोमवारी रात्री शहर पोलिसांनी कारवाई केली असून या वाहनातून कोंबुन ठेवलेल्या कत्तलिसाठी नेत आणणाऱ्या ५ गायींची मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच गाडीतून गुरे पकडली गेली

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळून एम.एच. ११ ए.के.६००९ या क्रमाकांच्या स्कॉर्पिओतून गुरांना कोंबून त्याची वाहतूक केली जात असल्याची पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे, योगेश इंधाटे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी गुरांनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता.

पोलिसांनी हे वाहन शहर पोलीस ठाण्यात आणले. वाहन जप्त करण्यात येवून वाहनातील ५ गायींची मुक्तता करुन त्या गायींना पांझरापोळ येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार