झुंजार प्रतिनिधी । पारोळा
येथील मनन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा दै.’तरुण भारत’चे तालुका प्रतिनिधी विशाल महाजन यांचा तरुण भारतच्या सर्व प्रातिनिधी म्हणून टॉप थ्री प्रतिनिधीमध्ये स्थान मिळाल्याने आदर्श शिक्षक स ध भावसार यांनी महाजन यांचा विशेष सत्कार केला.
दै.तरुण भारत वृत्तपत्रात विशाल महाजन गेल्या पाच वर्षांपासून पारोळा तालुका प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. नुकताच त्यांचा दै. तरुण भारतच्या सर्व प्रतिनिधीमधून टॉप थ्री मध्ये स्थान मिळवल्याने तरुण भारत तर्फे संचालक संजय नारखेडे,सचिव सचिन बोरसे,व्यवस्थापक मनोज महाजन,संपादक दिनेश दगडकर यांच्या हस्ते भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला होता.
याचा शहरवासी म्हणून विशेष अभिमान वाटल्याने राज्य आदर्श शिक्षक स ध भावसार यांनी गुणगौरव सोहळ्यात महाजन यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी ऍड.मोहन शुक्ला,ऍड कवी विलास मोरे,केशव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अ. दे.भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपण हे वाचले का?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम