झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
बारामती :- बारामती वकीलबार कक्षामध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक कवी ॲंड. संजन मोरे साहेब यांनी सामाजिक उत्कृष्ट लेखनाबद्दल असंख्य वकिलांच्या उपस्थितीत ॲंड. संजय चंदनशिवे यांचा जाहीर सत्कार करून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ अर्थतज्ञ, ज्येष्ठ अभ्यासक, तज्ञ विचारवंत, राज्यसभेचे माजी खासदार मा. नरेंद्र जाधव सर लिखित प्रज्ञा महामानवाची (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र लेखन व कार्य) भेट दिला.
यावेळी आपले मत व्यक्त करताना ॲंड. चंदनशिवे म्हणाले, सरांनी माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी व माझ्यातील ऊर्जेला अजून प्रज्वलित करण्यासाठी जो प्रयत्न केला तो मी कधीच विसरू शकत नाही. तसेच ज्येष्ठ अभ्यासु विधिज्ञ मा. अजित बनसोडे यांनी मला महात्मा ज्योतिबा फुले यांचा ग्रंथ भेट दिला. यांचेही मनापासून आभार व्यक्त करत आहे. अशीच ऊर्जा मिळत राहवो ही भगवंत चरणी प्रार्थना.
यावेळी अँड. अमोल सोनवणे अँड.अजित बनसोडे, अँड. योगेश, बारामती वकिल संघटनेचे उपाध्यक्ष अँड. रविकिरण,अँड. तुषार ओव्होळ,प्रसिद्ध साहित्यिक कवी संजन मोरे अँड. महेंद्र लोंढे, इंदापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड जमीर मुलाणी,अँड. वैभव कांबळे आणि अँड. अक्षय जाधव आदि प्रमुख उपस्थितीत होते.
आपण या बातम्या वाचल्या का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






