लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये विदयार्थी परिषद निवडणुकीतून विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार : – लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया विषयी विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने लोणार येथील लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये तब्बल 545 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक आणि लोकशाही प्रक्रियेचे धडे घेतले.


लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये शैक्षणिक वाटचालीबरोबर क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी हाती घेतले जातात स्कूलमधील 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेची निवडणूक प्रक्रिया दि. 08-07-22 शुक्रवार रोजी पार पडली विद्यार्थी परिषदेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमधून हेड बॉय हेड गर्ल ऍक्टिव्हिटी हेड कल्चरल हेड यासाठी निवड करण्यात आली विद्यार्थी परिषदेच्या या निवडणुकीत उभे राहीले 16 उमेदवारांनी तब्बल एक दिवस प्रचार केला नंतर प्रत्यक्ष मतभेटी द्वारे मतदान आणि मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये तब्बल 545 विद्यार्थी मतदारांनी मतदान केले.
या निवडणुक निकाल सोमवारी 11-07-22 लागला, हेड बॉय म्हणून हर्ष दुधमोगरे आणि हेड गर्ल म्हणून अनुष्का विभुते यांची निवड विद्यार्थ्यांनी केली.

या उपक्रमाविषयी प्राचार्य श्री कुलकर्णी सर म्हणाले की आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगातील भक्कम व यशस्वी लोकशाही आहे देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान महत्त्वाचे आहे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वय वर्ष 18 नंतर प्रत्येक विद्यार्थी सजग नागरिक म्हणून मतदानाचा हा पवित्र हक्क बजावत असतो विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आत्तापासूनच निवडणूक मतदान लोकशाही आणि संसदीय प्रक्रियेविषयी ज्ञान व्हावे आणि त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशातून हा उपक्रम राबवण्यात दरवर्षी राबवण्यात येतो.


हा उपक्रम लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शेख हाजी मसूद सर आणि फैसल सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राबविण्यात येतो तर या निवडणुकी प्रकियेमध्ये उपप्राचार्य शेख सर आणि प्रविण पऱ्हाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मतदान प्रक्रियेमध्ये पारवे सर, चिपडे सर, राठोड सर, पडघान सर, जाधव सर, कापुरे मॅडम, चौधरी सर, आंबेकर सर खांडेभराड मॅडम आणि वनवे सर यांचे सहकार्य लाभले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार