जळगाव :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत आहे अश्यातच जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ‘हॅलो गायीज् आज में आत्महत्या करणे वाला हू, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ हा नऊ सेकंदाचा व्हिडीओ तयार करुन व्हायरल करीत एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी एक वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तरुणाचे कुटुंबीय देखील अचंबीत झाले आहेत.
मृत धिरज फर्निचर काम करायचा
धिरज शिवाजी काळे (वय 22, रा. हरीविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटना अशी की, दुसरी पर्यंत शिक्षण झालेला धिरज हा वडीलांसोबत फर्निचर काम करीत होता. गुरूवारी सकाळी नऊ वाजता तो नियमितपणे वडीलांसोबत स्टेट बँक कॉलनी येथे एका बंगल्यात फर्निचर काम करण्यासाठी गेला. थोडावेळ काम केल्यानंतर 10.30 वाजेच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. वडील दुसऱ्या खोलीत काम करीत होते. दुपारी एक वाजता डबा खाण्यासाठी वडीलांनी त्याला आवाज दिला. प्रतिसाद न आल्यामुळे वडीलांसह इतर लोकांनी धिरजचा शोध घेतला. वरच्या मजल्यावरील खोलीत धिरजने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे दृष्य दिसून येताच वडीलांना धक्का बसला.
व्हिडिओ केला व्हायरल
काहीएक कारण नसताना, सकाळपासून सामान्यपणे स्वभावात वागलेला असताना धिरजने अचानकपणे आत्महत्या का केली? हा प्रश्न वडीलांना पडला. यानंतर नागरिकांनी धिरजचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. दरम्यान, धिरजने आत्महत्येपूर्वी नऊ सेकंदांचा एक व्हिडीओ काही मित्र, समाजमाध्यमात व्हायरल केला होता. त्यात त्याने मी आत्महत्या करीत आहे. माझा व्हिडीओ लाईक करा, कमेंट करा अशी विनंती केली आहे. धिरज समाज माध्यमांवर अॅक्टीव होता. त्याने आत्महत्येचा निर्णय देखील समाजमाध्यमावर जाहीर केला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






