मुंबई :- सध्याचे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.
संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. शिंदे सरकारने मविआचे 5 निर्णयांना स्थगिती दिली आहे. याचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला.
हे ढोंगी सरकार
संजय राऊत म्हणाले की, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. हे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय होते. विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव दिले. औरंगाबादचे संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशीव केले. केंद्र सरकारची परवा न करता हिंदुत्ववादी म्हणून हा निर्णय घेतला. भाजपचीही नामांतराची मागणी होती. मात्र, शिंदे आणि फडणवीस सरकार येताच या निर्णयाला स्थगिती दिली. त्यांच्यासारखे लोक नाहीत. मुळात हे हिंदुत्ववादी सरकार नसून, बेकायदेशीर सरकार आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही.
सरकारने काय साध्य केले?
संजय राऊत म्हणाले की, या सरकारबद्द्लचा निर्णय अद्याप सर्वाेच्च न्यायालयाने घेतला नाही. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे. त्यांनी हे निर्णय घेत काय साध्य केले, हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करायला हवा. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातात काहीच नाही. शिवसेनेनी हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपकडून करण्यात येत होती. राजकीय आक्रोश करण्यात येतोय आणि दुसरीकडे हे नामांतराबद्दल शिवसेनेने घेतलेले निर्णय रद्द केले. लोकांचा आग्रह आहे की, औरंगाबादचे संभाजीनगर करा. उस्मानाबादचे धाराशीव करा आणि नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नामांतर करा. याला भाजपकडून का स्थगिती देण्यात आली, असा सवाल राऊत यांनी केला.
औरंगजेब तुमचा कोण?
संजय राऊत म्हणाले की, औरंगजेब, उस्मान तुमचे कोण लागतात हे सांगावे. हे बधिर सरकार असल्याने ते केवळ स्थगिती देण्याचे काम करते आहे. मी शिवसेनेचा मालक नाही. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. संसदेतील नव्या डिक्शनरी सारखी निष्ठावान असल्याची व्याख्या बदलावी लागेल. देशात आणीबाणीपेक्षा जास्त धोकादायक परिस्थिती असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंचा दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार असून संघटनात्मक बांधणी करणार आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात उद्धव काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
हे वाचलंय क ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४