सोयगाव । प्रतिनिधी :-दि.१४..जिल्हा पोलीस दलाच्या नुकताच झालेल्या प्रशासकीय बदल्यांमधून सोयगाव पोलीस ठाण्याला मिळालेल्या नूतन सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पदभार सुपूर्द केला आहे.त्यामुळे आता सोयगाव पोलीस ठाण्यात नवा भिडू,नवे राज असा प्रकार सुरु झालेला असल्याने पोलीस ठाण्य्च्या कामात सुसूत्रता येईल असेही नुतनं सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सांगितले.
सोयगाव पोलीस ठाण्यात नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदली मधून पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनुभवी आणि दबंग सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना पदभार देण्यात आला यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीची माहिती देत पदभार दिला यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती..
सोयगाव पोलीस ठाण्याच्या पदभार घेवून सोयगावला कायदा व सुव्यस्था सुरळीत करण्यासाठी काम करणार असल्याचे अनमोल केदार यांनी सांगितले…
चौकट
नवा भिडू,नवा राज सोयगाव पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस कर्मचारीही पुन्हा सातकर झालेले असून नव्या भिडूच्या कामाची पद्धत समजावून घेतली आहे.

छायाचित्रओळ-नूतन सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचेकडून पदभार स्वीकारतांना.
आपण या बातम्या वाचल्या का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






