औरंगाबादचं नवं नाव छत्रपती संभाजीनगर; CM शिंदेंची मोठी घोषणा

Spread the love

नामांतराचं ठरलं! औरंगाबादचं नवं नाव छत्रपती संभाजीनगर; CM शिंदेंची घोषण

Mumbai :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknatha Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cm Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Cabinet Meeting)

मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

याशिवाय मुंबई आणि उपनगर भागामध्ये MMRDA त्या विविध प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींसाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

टीम झुंजार