मुंबई, (प्रतिनिधी) : – सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच मानव जातीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे पोटच्या मुलीला आधी रागात मारहाण केली व त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली असून एवढ्यावरचं हा ‘नराधम बाप’ थांबला नाही तर या नराधम बापाने मुलीच्या मृतदेहासोबत बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आल्याने जन्मदात्याच्या नात्याला काळिमा फासल्या गेलं आहे. त्या नराधम बापा विरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो तसेच हत्येचा गुन्हा दाखल आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार भिवंडी परिसरात राहत असलेल्या एका परिवारात मृत मुलगी नराधम बाप आणि आई असा परिवार राहत होते.दरम्यान पोटच्या मृत पीडित मुलीवर अनेक दिवसापासून नराधम बाप लैंगिक अत्याचार करत असल्याने मृत मुलगी त्याला विरोध करत असल्याने नेहमीच बाप – लेकीमध्ये भाडणं व्हायची, त्यातच नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून मुलीवर बळजबरी करत असल्याने दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात बापाने मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या मृत मुलीवर बलात्कार केला. या नराधम बापाने तिचा टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर नराधम बापावर पोक्सोसह अत्याचार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. नराधम बापाला भिवंडी शहरातून तीन तासातच अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






