मेष:-
ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ:-
शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल.
मिथुन:-
शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा.
कर्क:-
गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा.
सिंह:-
मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.
कन्या:-
कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.
तूळ:-
मनात हेतू ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.
वृश्चिक:-
सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल.
धनू:-
माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल.
मकर:-
कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात.
कुंभ:-
लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल.
मीन:-
हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






