पोहणे जीवावर बेतले:चौघांपैकी एक जण गिरणा नदीत बुडाला; शोध कार्य सुरू, तिघांना वाचवण्यास गावकऱ्यांचे यश

Spread the love

जळगाव :- गिरणा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी एक मुलगा पाण्यात बुडाला. तर तिघांना गावकऱ्यांनी वाचवले. बुडालेल्या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

घटना अशी की, शिवाजीनगरात राहणारे यश पप्पु भालेराव (वय 14), प्रेम परशुराम झांझळ (वय 15), मयूर संतोष सपकाळे (वय 15) व विशाल हिलाल जोहरे (वय 16) असे चौघे शनिवारी भोकणी गावाजवळ गिरणा नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना हे सर्वजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडत होते. हा प्रकार नदीकाठी असलेल्या काही ग्रामस्तांच्या लक्षात आला. त्यांनी यश, परशुराम व प्रेम यांना पाण्यातून बाहेर काढले. पण विशाल मात्र बाहेर निघू शकला नाही. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तो गाळात, डोहात अडकला.

आज पुन्हा शोधमोहिम

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाळधी दुरक्षेत्रचे गजानन महाजन, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदणकर, प्रवीण सुरवाडे, तालुका पोलिस ठाण्याचे संजय भालेराव यांच्यासह तहसिल व अग्निशमन विभागाचे लोक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, शनिवारी बांभोरी गावाचा बाजार असल्यामुळे अग्निशमचे वाहन बाजारात अडकले. यानंतर त्यांनी मागे येत दुसऱ्या रस्त्याने घटनास्थळ गाठले. रात्री आठ वाजेपर्यंत विशालचा शोध सुरू होता. अंधार पडल्यामुळे शोधमोहिम थांबवण्यात आली. यावेळी विशालसह इतर मुलांचे कुटुंबीय देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पाळधी दुरक्षेत्रच्या कर्मचाऱ्यांनी विशालसोबत असलेल्या मुलांची चौकशी करुन घडलेली घटना जाणून घेतली. रविवारी सकाळी पुन्हा शोध माेहिम राबवण्यात येणार आहे.

माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे गजानन महाजन, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदणकर, प्रवीण सुरवाडे, तालुका पोलिस ठाण्याचे संजय भालेराव, तहसील व अग्निशमनचे लोक घटनास्थळी पोहोचले. शनिवारी बांभोरीचा बाजार असल्याने अग्निशमनचे वाहन अडकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या रस्त्याने घटनास्थळ गाठले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार