मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लघुवाद न्यायालय, मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने लघुवाद न्यायालय, मुंबई येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त `मेंकिंग अँड इवोल्यूशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सिन्स इंडिपेन्डेन्स’ या विषयावर वरिष्ठ वकील पुनीत चतुर्वेदी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय वाघवसे होते.प्रास्ताविक मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतिश हिवाळे यांनी केले. सूत्रसंचालन न्यायाधीश श्रीमती जे. एस. जगदाळे यांनी केले.
या उपक्रमाचे आयोजन प्रबंधक ना. वा. सावंत, अप्पर प्रबंधक श्रीमती एन. वाय, शाहिर, अतुल ग. राणे, श्रीमती आर. के. हजारे यांनी केले. कार्यक्रमास विधिज्ञ संघटनेचे पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४