भंडारा :- सध्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे अश्यातच भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पवनारा येथे विलाश रामेश्वर कावळे यांच्या राहत्या घरी नाग जातीचे ११ पिल्ले व एक मादी साप पकडण्यात सर्प मित्राला यश आले हे दृश्य पाहण्यासाठी एकच गर्दी उसडली होती.
तीन नाग जातीचे दीड फुट लांब पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली दरम्यान तुमसर येथील सर्पमित्र यांना पाचारन करण्यात आले त्यांच्या शोधमोहीमेत ११ दीड फुट लांब लगभग तीन दिवसाचे पिल्ले व ५ फुट लांब मादी साप पकडण्यात यश आले सर्व नांग जातीचे विषारी साप असून यात न्यूरोटॉक्झीम विष असल्याचे सर्प मित्रानी सांगितले.
पिल्याची संख्या जास्त असु शकते असा अंदाज वर्तवन्यात आला त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवन्याविषयी सांगण्यात आले कारण या सापाने स्वयंपाक घरात एक खोलगट खड्डा आढळून आले यात अंडे दिल्याचे भाकित करण्यात आले असून लगभग ३०ते ३५ अंडे घालण्याविषयी सांगण्यात आले सर्व सापाना वनविभागाच्या कर्मचार्याच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






