पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या तरुणाला कुटुंबातून लग्नास विरोध झाला. यातून त्याने मुलीचे इतरत्र लग्न होऊ नये म्हणून मानसिक त्रास दिला. व्हिडीओ कॉलवर दरडावत असतानाच त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने व्हिडीओ कॉल सुरु असतानाच त्याच्यासमोरच गळफास घेतला. या मुलीचा 19 दिवसांनी उपचारादरम्यान आज दुपारी 12 वाजता मृत्यू झाला.
आपल्याच समाजातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या आणि इतरांशीही लग्न करू देणार नाही अशी धमकी देण्यासाठी वारंवार व्हीडीओ कॉल करणाऱ्या तरुणासमोरच दिव्या दिलीप जाधव नावाच्या तरुणीने २४ जून रोजी गळफास घेतला. त्यावेळी शेजारच्या तरुणाच्या मदतीने तिला वाचवण्यात तर यश आले होते; पण उपचार सुरू असताना बुधवारी तिची प्राणज्योत मालवली. कॉल सुरू असताना केलेले हे कृत्य पाहून घाबरलेल्या त्या तरुणाने तिच्या शेजारी राहाणाऱ्या तरुणाला सांगून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
१९ दिवसांची झुंज अयशस्वी
दिव्या जाधव हिचे निलेश मंगलसिंग गायकवाडशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते तासंतास फोनवर बोलत बसायचे. ही बाब लक्षात आल्यावर आणि दिव्याने निलेशशीच लग्न करण्याचा निर्धार बोलून दाखवल्यावर तिचे हातमजुरी करणारे वडील दिलीप जाधव आणि कुटुंबीयांनी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे जाऊन मुलाचे घर गाठले. त्यांच्या सोबत चार पंचही होते. त्यांनी दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर निलेशची आई भडकली. आपल्या कुटुंबाची आणि तुमच्या कुटुंबाची बरोबरी होऊ शकत नाही, असे सांगत त्यांचा अवमान करून त्यांना तिने घालवून दिले. निघताना यापुढे निलेशने आपल्या मुलीशी बोलू नये, संपर्क करू नये असे दिलीप जाधव यांनी बजावले.
त्यानंतर दिव्यासाठी इतर मुले पाहाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, अन्य कोणाशीही तुझे लग्न होऊ देणार नाही, येणाऱ्या मुलाला आपले फोटो पाठवून लग्न मोडेल, अशी धमकी निलेश व्हीडीओ कॉल करून तिला देत होता. २४ जून रोजी दुपारी त्याने असा कॉल केल्यावर दिव्याने त्याच्यासमोर फास घेतला होता.
विनोद धावून आला; पण अखेर दिव्याचे प्राण गेलेच दिव्या फास घेते आहे हे पाहाताच निलेश गायकवाड याने दिव्याच्या शेजारी राहाणाऱ्या विनोद गायकवाड याला फोन करून ही माहिती दिली. त्यामुळे विनोद तिच्या घरी धावला. शेजारच्यांच्या मदतीने त्याने तिला खाली उतरवले. त्यावेळी तिचा श्वास सुरू होता. त्यामुळे तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण अखेर बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
आधीच तक्रार केली असती तर हे टळले असते
निलेश गायकवाड दिव्याला वारंवार व्हीडीओ कॉल करून धमकी देत होता. आणखीही काही त्रास तो देत असेल; पण त्यावेळी तिने ही घटना लगेच कुटुंबियांना सांगितली.त्यांनी निलेशला समजही दिली. पण पोलिसांकडे तक्रार केली असती तर कदाचित २४ तारखेचा प्रकार घडला नसता आणि आज दिव्या तिच्या कुटुंबासमावेत असती.
आई आणि मुलाने मिळून दिव्याला आत्महत्येस भाग पाडले.
दिव्याचे वडील आणि आई म्हणजे माझा लहान भाऊ आणि वहिनी मजुरीसाठी दिवसभर बाहेर जात असत. त्याचा फायदा घेऊन निलेशने दिव्याला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावली. ज्यावेळी आम्ही लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी गेलो तेव्हा निलेशच्या आईने दिव्याचे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांचे घरही नाही, ते आमच्या स्तराची वागणूक आणि हुंडा देऊ शकणार नाही असे सांगत भिकारी म्हणून त्यांचा आणि पंचाचाही अपमान केला. त्यानंतर निलेश दिव्याला फोन करून लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देत होता. त्याच्या जाचाला कंटाळून तिने हे कृत्य केले.
(पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार)
दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी मृतदेह घेण्यास दिला नकार.
बुधवारी सकाळी रुग्णालयात दिव्याचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी निलेश गायकवाड आणि त्याच्या आईला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तणावही निर्माण झाला होता.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.