धार अपघात: इंदूरहून महाराष्ट्रात येणारी एसटी पुलावरून कोसळली; 13 जणांचा मृत्यू
भोपाळ : – मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर 10 ते 12 प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती जण होते याची ठोस माहिती अद्यपपर्यंत मिळू शकलेली नसून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदूरहून महाराष्ट्रात येणारी एसटी नदीत पडून झालेल्या अपघातात 12जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात खालघाट संजय सेतू इथून ही बस नदीत कोसळल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात आलं आहे. या एसटीत नेमके किती प्रवासी होते हे समजू शकलेलं नाही. अपघाताचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मृत व्यक्तींबद्दल माहिती अजूनही मिळालेली नाही. प्रशासनाकडून जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एसटी महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इंदूर ते अमळनेर एसटी बसचा धार जिल्ह्यात नर्मदा नदीजवळ अपघात झाला आहे. नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बाकी बचावकार्य सुरू आहे. साधारण साडेनऊ वाजता अपघात झाला. सकाळी साडेसात वाजता इंदूरहून निघाली. अमळनेर आगारात दुपारी 1-2 पर्यंत पोहचणं अपेक्षित होतं. बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असण्याची शक्यता. बसची क्षमता 42 प्रवाशांची आहे”.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हेल्पलाइन जारी

MH40 N9848 असा या एसटीचा नंबर फोटोत दिसत आहे. दरम्यान इंदोरहून येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री याबाबात अधिक माहिती घेत आहेत असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे)
हे वाचलंत का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






