पूर्णा/प्रतिनिधी:- शहरातील सर्व शाळेतील वर्ग ९ वी ते १० ईयातेतील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या कोवीड लसीकरणाचे काम आरोग्य विभागाच्या वतीने जोमाने चालू असून त्यास पालकांच्या समंतीने प्रतिसाद मिळत आहे.
अशी माहिती पूर्णा न. पा. चे मुख्याधिकारी नितीशकुमार, नायब तहसीलदार, डॉ एच जी गाडेकर, ( वैद्यकीय अधिक्षक) डॉ रुपाली बोरकर (वैद्यकीय अधिकारी), यांनी दिली आहे. आता पर्यंत ३८६४८ पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकार व जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची मोहीम हातात घेण्यात आली आहे.
दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाच्या संख्येने सर्वांची झोप उडाली आहे. यावर वेळीच आवर घालण्यासाठी आरोग्य विभागाने तत्परतेने कामास लागून युद्धपातळीवर लसीकरणाचे काम हाती घेतले आहे. पूर्णा शहर व तालूक्यातील संपूर्ण शासकीय, खासगी शाळेत लसीकरणाचे काम जोमाने चालू असून पालकांच्या समंतीने या मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच लहान मुलाबाळासह सर्व थोर मंडळीने गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळावे, काही दिवसासाठी शेजारधर्म टाळावा, एकमेकांशी स्पर्श न लांबून बोलावे, तोंडाला नेहमी मास्क बांधावा, वेळोवेळी सानिटायझर, साबण वापर करुन हात धुवावेत.
आदी आरोग्य विभागाच्या सुचनेचे पालन करुन कोरोनावर मात करावी. अशी माहिती नायब तहसीलदार नितीशकुमार व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वाघमारे आरोग्य सेविका,पुजा भांड आरोग्य सेविका, कृष्णा चापके, फैजूला खान डाटा आपरेटर, आकाश जोंधळे, श्रीमती झांबरे हे कर्मचारी सहकार्य करीत आहेत. दरम्यान, दुचाकी, चारचाकी वाहन चालकाने मास्क न बांधल्याने दंड वसूल करणे चालू आहे.
आरोग्य खात्यात अधिकारी कर्मचारी कमी असल्याने येत आहेत अडचणीशहरातील व तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे यंत्रणा गतीने चालवणे अवघड होत आहे. खेडेगावात सेवा देण्यासाठी आरोग्य सेविका व ईतर आरोग्य कर्मचारी संख्या फार कमी आहे. कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना देणे गरजेचे आहे.