बाळंत झालेल्या मुलीला जेवणाचा डबा देण्यासाठी जात असलेल्या पादचारी इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धारागीर गावाच्या समोर साईनाथ ढाब्याजवळ बाळंत झालेल्या आपल्या मुलीस ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे डबा देण्यासाठी जात असलेल्या 44 वर्षीय पादचारी इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना दि 17 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनील भास्कर शिंदे वय 44 वर्षे हे भालगाव तालुका एरंडोल येथे आपल्या परिवारासह राहतात ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे त्यांची मुलगी जयश्री सागर धिवरे ही बाळंत झाली म्हणून भालगाव येथून आपल्या घरून निघून मुलीचा जेवणाच्या डबा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पायी जात असताना पाऊस सुरू होता म्हणून रस्त्याच्या कडेने चालत जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे सुनील भास्कर शिंदे वय 44 वर्षे हे जागीच ठार झाले.

राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे व पाऊस सुरू असल्यामुळे मयताच्या अंगावरून अनेक वाहनं निघून गेली त्यामुळे मयताच्या चेहरा हा ओळखीचा लागत नव्हता घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी तात्काळ बीट हवालदार विकास देशमुख,अनंत पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. पोलीस कर्मचारी व नागरिकांनी चेंदामेंदा झालेल्या मयतास ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.

एरंडोल पोलीस स्थानकात ईश्वर भास्कर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हवलदार विकास देशमुख.
हे तपास करीत आहे. मयत सुनील शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, जवाई असा परिवार आहे घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे भालगाव ते ग्रामीण रुग्णालय एरंडोल हे पाच किलोमीटरचे अंतर मयत सुनील शिंदे हा मुलीला जेवणाचा डबा देण्यासाठी पायी चालत येत होता.

पोलीस विलास पाटील यांच्या सतर्कतेमुळे मयताची पटली ओळख

मयताच्या अंगावरून अनेक वाहने गेल्यामुळे त्याच्या त्याच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता म्हणून त्याची ओळख पटत नव्हती. मयताची ओळख पटावी म्हणून हवालदार विलास पाटील यांनी त्यांची झडती घेतली असता त्याच्या खिशात मोबाईल नंबर लिहिलेला कागदाची चिठ्ठी आढळून आली म्हणून हवलदार विलास पाटील यांनी त्या नंबरवर फोन लावून विचारणा केली असता तो मोबाईल नंबर हा मयताचे जवाई सागर धिवरे रा अकुलखेडे तालुका चोपडा यांच्या असल्याने त्यांना मयताचे फोटो व्हाट्सअप वर पाठवण्यात आले. फोटो पाहून जावई यांनीसुद्धा त्यांना ओळखले नाही म्हणून हवालदार विलास पाटील यांनी थोडी चौकशी केली असता जावाई यांनी सांगितले की माझी सासरवाडी ही भालगाव येथील आहे. म्हणून हवालदार विलास पाटील यांनी भालगाव चे पोलीस पाटील यांना भ्रमणध्वनीवर फोन करून गावात चौकशी करण्याची सूचना दिली.

पोलीस पाटील हे गावात चौकशी करीत असताना ते सुनील भास्कर शिंदे यांच्या घरी गेले असता माहिती पडले की ते रात्रीपासून घरी आले नाही मयताचे भाऊ ईश्वर शिंदे, यांच्यासोबत निलेश मराठे, गोविंदा सपकाळे, रमेश आहिरे व इतर हे ग्रामीण रुग्णालय येथे येऊन पाहिले असता मयत हा सुनील भास्कर शिंदे असल्याची ओळख पटली.ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मुकेश चौधरी यांनी शवविच्छेदन करून मयतास नातेवाईकांच्या स्वादीन करण्यात आले.

आपण या बातम्या वाचल्यात का?


टीम झुंजार