Virel Video : चिमुरडीचा चरणस्पर्श! जवानांसह देशभर हर्ष !!

Spread the love

‘संस्कार रुजविणाऱ्या आई-वडिलांचे आभार

बंगळूर : – वृत्तसंस्था रेल्वे स्थानकावर लोक गाडीची वाट बघत असतात. भारतीय लष्करातील जवानांचा एक गटही या गर्दीत आहे. अचानक एक चिमुरडी जवानांच्या दिशेने येते. जवानांना निरखून बघते. मग एका जवानाला चरणस्पर्श करते. अवच्या देशात या एका चरणस्पशनि एकच हर्ष पसरला आहे.

चिमुरडी जवानाच्या पायावरून आपला हात स्वतःच्या डोक्यावर नेते. जवान चिमुरडीच्या डोक्यावरून हात फिरवतो अन अवघा देश या चिमुरडीला डोक्यावर घेतो,

कुठल्या रेल्वे स्थानकावर हे दृश्य चित्रीत झालेते माहिती नाही, चिमुरडी कोण आहे, ते माहिती नाही.
जवान नेमके कोण तेही माहिती नाही…ती फक्त देशभक्तीची भावना…केवळ या एका बळावर हा व्हिडीओ सोशल मीडियात कमालीचा व्हायरल झाला आहे.

ज्या जवानाला चिमुरडी चरणस्पर्श करते तो हर्षित आहेच; अत्यंत मायेने हा जवान चिमुरडीच्या डोक्यावरून हात फिरवतो आहे… भरून पावल्याचा अभिमान मिरवतो आहे… हे दृश्य इतके भावस्पर्शी आहे की, भाजपचे खासदार पी. सी. मोहन यांनाही ते शेअर करण्याचा मोह आवरला नाही…मुलांना असे संस्कार देणे हे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे’, असेही या व्हिडीओसह खासदार मोहन यांनी नमुद केले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. या कन्येला असे संस्कार देणान्या आई-वडिलांना धन्यवाद’, असे इराणी यांनी त्यावर लिहिले आहे. या व्हिडीओला व्हिडीओला ९ लाख न्यूज् अन् ६ लाख लाईक्स मिळाले आहेत.

एका रेल्वे स्थानकावर जवानाला चरणस्पर्श करताना चिमुरडी.


पहा व्हिडिओ :

हे वाचलंत का ?

टीम झुंजार