झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
पुणे :- पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरामध्ये १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मूळ व्हिडीओशी छेडछाड करत पोलीस प्रशासनाने चुकीचे पुरावे कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर सादर केल्याचा गंभीर आरोप करत आज पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले.
या वेळी उपस्थित आंदोलकांनी कोरेगाव भीमा दंगली मधील मूळ व्हिडिओंसोबत छेडछाड करून पोलिसांनी चौकशी आयोगा समोर चुकीचे पुरावे सादर केल्याचा गंभीर आरोप करत,दंगलीतील मुख्य आरोपी असणाऱ्या भिडे आणि एकबोटेंवर त्वरित कायदेशीर कारवाई करा,विजयस्तंभावर बेकायदेशीरपणे लावलेली पाटी लवकरात लवकर हटवा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रसंगी,भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सचिन बनसोडे,नफ च्या शकुंतला कांबळे,नंदा चौगुले,प.महाराष्ट्र प्रभारी आर बी बनसोडे,भारत मुक्ती मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी पंडागळे,ॲड.महेश देशमुख,भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे,भारतीय विध्यार्थी मोर्चाचे प्रभारी श्रेयश वेताळ,बहुजन मुक्ती पार्टी पुणे शहराध्यक्ष किशोर तुपारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






