मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबडय़ांची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटाला दिला.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्याचबरोबर सायंकाळी जिल्हा प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसह पुन्हा ऑनलाइन बैठक घेतली. कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.
रामदास कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
मुंबई : हातची सत्ता गेल्यामुळे सुडाच्या राजकारणाचा भाग म्हणून भाजपनेच शिवसेनेत फूट पाडली, मात्र त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फोडले जात आहे. विनाकारण पक्षाला व पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांना दिला. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी कदम यांच्या आरोपाचा समाचार घेतला.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






