निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक केल्याची फौजदारी तक्रार न्यायालयाने फेटाळली.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-
येथील निवृत्त प्राध्यापक आर.एस.निकुंभ यांची आनंदा रामदास चैधरी,संगीता आनंदा चौधरी व सेन्ट्रल बँकेच्या दोन अधिका-यांनी फसवणूक केल्याची फौजदारी तक्रार न्यायालयाने फेटाळली.

याबाबत माहिती अशी,की निवृत्त प्राध्यापक आर.एस.निकुंभ यांची आनंदा रामदास चौधरी,संगीता आनंदा चौधरी यांचेसह सेन्ट्रल बँकेच्या दोन अधिका-यांनी फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम १२०ब, ४२०, ४०६, ४०९, ४६७,४६८ व ३४ अन्वये तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल कण्याची मागणी प्रा.निकुंभ यांनी न्यायालयाकडे केली होती.

प्रा.निकुंभ यांनी दिलेल्या तक्रारीत सर्व संशयितांनी संगनमत करून बनावट पी.पी.एस.च्या माध्यमातून बँकेतून परस्पर रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता.या तक्रारीबाबत न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.आनंदा चौधरी व त्यांचे सहकारी यांच्यातर्फे अँड.राहुल पारेख यांनी युक्तिवाद करून सदराची तक्रार फेटाळण्याची विनंती केली.

न्यायाधीश श्रीमती बी.ए.तळेकर यांनी सदर तक्रार फेटाळून लावली.आनंदा चुअधारी व अन्य संशयित यांचेतर्फे अँड.राहुल पारेख यांनी काम पाहिले त्यांना अँड.महेंद्र चौधरी,अँड.गजानन पाटील,अँड.अजिंक्य काळे यांनी सहकार्य केले.या निर्णयामुळे आनंदा चौधरी (भगत) व सर्व संशयीतांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार