मद्यपान करताना भांडण; रागाच्या भरात तरुणाचा चाकूने भोसकले ; ३ आरोपी अटकेत.

Spread the love

जळगाव :- गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसते आहे. जळगाव शहरात आज एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) असे मयताचे नाव असून याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चार मित्रांसोबत मद्यपान करताना क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. यानंतर तिघांनी चाकूने भोसकून चौथ्याचा खून केला. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मील परिसरातील मोकळ्या जागेत घडलॉ. घटनेनंतर शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय 25, रा. गेंदालाल मील भोंग्याजवळ) असे मृत युवकाचे नाव आहे. तो बुधवारी दुपारी पवन उर्फ देव किसन लाडे (वय 19), मनोज जलाल गायकवाड (वय 42 ) व विलास तुकाराम निकम (वय 34, सर्व रा. गेंदालाल मील) यांच्यासोबत मद्यपान करण्यासाठी गेला होते.

गेंदालाल मील परिसरातील मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाखाली त्यांनी मद्यपान केले. मद्यपान करताना क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. शिविगाळ झाली. त्यानंतर वाद वाढत गेल्यानंतर तिघांनी रहीम याच्या डोक्यावर व पोटावर चाकूने भोसकून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयात दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते. मृत रहीम याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आईवडील व बहिण असा परिवार आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित ताब्यात

शहर पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये रहीम याच्यासोबत जाताना तिघे संशयित दिसले. पोलिसांनी त्यांना पळून जाण्याच्या तयारीत असताना बिग बाजार परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलिस ठाण्यात सुरु होते.

हे वाचलंय का ?

टीम झुंजार