लोणार उध्दव आटोळे
लोणार :- सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी तत्पर असले पाहिजे . सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारा पक्षच खऱ्या अर्थाने बळकट असतो , असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परतूर विधानसभा निरीक्षक जिशान खान यांनी व्यक्त केले.मंगळवारी परतूर येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे,युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात,तालुका अध्यक्ष रमेश सोळंके,विजय राखे,अखिल काजी,भागवत कडपे आदींची उपस्थिती होती.
खान म्हणाले,स्थापनेपासून ते आजपर्यंत पक्षातील नेते कार्यकर्ते हे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाला पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे,असे आवाहन केले.
बैठकीला बाळासाहेब घारे,ओंकार काटे,राजेश तेलगड,पंजाबराव अवचार,योगेश बरकुले,कदीर कुरेशी,रजाक कुरेशी,शेख अफरोज,अन्वर पठाणगजानन अंभुरे,बंटी चव्हाण,सचिन चव्हाण,बाळासाहेब चव्हाण,महेश नागरे,सत्तार कुरेशी,योगेश अवचार,सोनाजी गाडेकर , माउली डाव्हरे आदींची उपस्थिती होती .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






