पानतांडे वाचविण्यासाठी खासदारांनी कसली कंबर
भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान बंगळुरूच्या शास्त्रज्ञ डॉ. हेमा बिंदू आदी शास्त्रज्ञाच्या दौऱ्याचा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी घेतला आढावा.
पानवेल उत्पादक शेतकऱ्यांना बंगळुरू येथे
प्रशिक्षण देण्याचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या आत्मा यंत्रणेला सूचना
जळगाव — जिल्ह्यातील कुऱ्हे (पानाचे) शेतकरी यांना आपल्या संस्थेमार्फत मिळालेल्या पानवेलीची ट्रायल व्हरायटी ची रोपांची लागवड केली असता चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले असून व संबंधित शेतकऱ्याने त्याचे मल्टिप्लिकेशन केले असून जळगाव जिल्ह्यातील वातावरणाला सदरील व्हरायटी त्याचे (नामकरण झालेले नाही) ही अतिशय सुयोग्य असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
ही व्हरायटी किंवा अजून कुठल्या दुसऱ्या सुधारित वाण असतील या स्थानिक कृषी विज्ञान केंद्र अथवा तेलबिया संशोधन केंद्र अंतर्गत असलेले पानवेल संशोधन केंद्र मध्ये उपलब्ध करुन देण्यात याव्यात या परिसरातील शेतकऱ्यांना बंगळूर येथे प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे केली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पारंपरिक पानतांडे नष्ट होण्याचे मुख्य कारण म्हणजे मूळ कुज व खोड कुज या रोगाचा मोठा प्रादुर्भाव होत असतो. शेतकरी लागवड करत असलेले वाण हे पारंपारिक असल्याने शेतकऱ्यांना शास्वत व रोगप्रतिकारक असे वाण उपलब्ध करून दिल्यास व त्यावर संशोधन झाल्यास पारंपारिक पीक जतन होण्यास मोठी मदत होईल असं मत देखील खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान बंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. हेमाबिंदू या खासदार महोदयांच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने येथील पान तांडे व पानवेल शेतकऱ्यांच्या भेटीसाठी व संवाद साधण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम येथे आली. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ.गायकवाड सर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किरण जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, कृषी सहाय्यक कमलेश पवार,भारत पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील, धनाई हायटेक नर्सरी संचालक बळीराम वराडे, गिरीश वराडे, सुभाष बारी, नीलेश वाणी,
रमेश सुन्ने, भगवान पाटील संजय ताडे पांडुरंग आस्वार, रघुनाथ सुन्ने ,महेंद्र आंबटकर,सुभाष सुन्ने, मोहन आस्वार,रमेश भुते, गोकुळ आंबटकर, भोजु बोडके, सचिन नागपुरे शिरसोली व परिसरातील पानवेल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मागणी केली आहे जळगाव जिल्ह्यात पानवेलींवर मुख्य रोग ज्यामुळे पानतांडे नष्ट होणार आहेत ते म्हणजे स्टेम रॉट/रूट रॉट या करिता नवीन वाण विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच या बाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण किंवा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने IIHR, Banglore या ठिकाणी आत्मा मार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे शेतकऱ्यांशी चर्चा करतांना केली आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.