Nana Patole : काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओतील व्यक्तीला बिलगून बसलेली महिला त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आहे
मुंबई :- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नाना पटोले एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचा दावा केला आहे. मात्र, आम्हाला व्यक्तिगतरित्या बदनाम करण्याचं कट कारस्थान भाजपने रचलं आहे. त्यामुळे आम्ही या विरोधात कारवाई करणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. व्हिडिओत पाठमोरी दिसणारी व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा केला जात आहे. हॉटेलमध्ये एका महिलेला बिलगून बसल्याचा हा व्हिडिओ मेघालयातील चेरापुंजी येथील पोलो ऑर्किड हॉटेलमधील असल्याचा दावा केला जात आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी “काय नाना… तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात…” असं ट्वीट करत हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. शहाजी बापू पाटील यांच्या गाजलेल्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या डायलॉगवरील गाण्याचं बॅकग्राऊण्ड म्युझिक या व्हायरल व्हिडिओला देण्यात आलं आहे.
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
माझ्याकडे तो व्हिडिओ आला, पाहिल्यावर मलाही आश्चर्य वाटलं, म्हणून मी पुन्हा चेक केला, बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल झाला आहे, तो काय साध्या माणसाचा व्हिडिओ नाहीये, तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशध्यक्षांचा हा व्हिडिओ आहे. मी तो व्हिडिओ ट्वीट करत नानांनाच विचारलं आहे, की नक्की काय आहे, पण त्यांच्याकडून कुठलं स्पष्टीकरण अद्याप आलं नाही, असं चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दरम्यान, या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत, आम्ही तक्रार सुरु केल्याचं सांगितलं. हा आम्हाला व्यक्तिगत बदनाम करण्याचा डाव असल्याची टीका केली आहे. हे कट कारस्थान भाजपने रचलं आहे. त्यामुळे आम्ही या विरोधात कारवाई करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






