कोरोना आढावा बैठकीत आ.चिमणराव पाटलांचे निर्देश.
पारोळा प्रतिनिधी :-पारोळा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला नागरिकांची बेफिकिरी जबाबदार असल्यामुळे बेफिकीर नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी दुपारी ३ वाजता कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात आ.चिमणराव पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.व्यासपीठावर प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अनिल गवांदे,पोलीस निरीक्षक संतोष भंडारे,मुख्याधिकारी ज्योती भगत उपस्थित होते.
कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांकडून दंडात्मक कारवाई करा अश्या स्पष्ट सूचना आ.पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डाँ.चंद्रकांत सूर्यवंशी,वैद्यकीय अधिकारी डाँ.योगेश साळुंखे यांच्याकडून लसीकरणाची सद्यस्थिती व कोरोना,ओमयक्रोनची संख्या वाढल्यास उपाययोजना काय आहेत याचा विस्तीर्ण आढावा घेतला.तर डाँ.योगेश साळुंखे यांनी ऑक्सिजन प्लांटला डीपी नसल्याने अडचणी येतात अशी खंत व्यक्त केली .
त्यावर आ.पाटील यांनी प्रस्ताव पाठवा जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने मंजूर करून देण्याचे आश्वसन दिले.यावेळी शहरप्रमुख अशोक मराठे,शेतकी संघाचे संचालक चेतन पाटील, ना.तहसीलदार राहुल मुळीक,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.चंद्रकांत सूर्यवंशी,कु.रु.वैद्यकीय अधिकारी डाँ.योगेश साळुंखे,डाँ.सुनील पारोचे,डाँ.गौरव कोतकर उपस्थित होते.
‘कारवाई’साठी भरारी पथक नियुक्त
बाजार बेट आणि गर्दीच्या ठिकाणी अर्थात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली असून मास्क न वापरणाऱ्यावर या पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व मुख्यधिकारी ज्योती भगत करणार आहेत.