प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शवपेटीचे लोकार्पण

Spread the love

प्रतिनिधी । भडगाव :- माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिसाच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पंधरवाडा साजरा करतांना शहरात प्रहार जनशक्ती पक्ष भडगाव तर्फे भडगाव पिपल बँकेचे चेअरमन माननीय आबासाहेब दत्तात्रय पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्रजी लांडे यांच्या शुभहस्ते शवपेटीचे नगर परिषद समोर लोकार्पण करण्यात आले.

भडगाव शहरात बऱ्याच वर्षांपासून शेवपेटीत नसल्याकारणाने नागरिकांना खूप असह्य त्रास होत होता व आजूबाजूच्या इतर खेड्यांमधून शवपेटी देणे साठी टाळाटाळ होत होती आणि रात्री अपरात्री सर्वदूर फिरूनहि शवपेटी मिळत नव्हती त्यामुळे अंत्यविधी सुद्धा लवकर करावा लागत असल्याने जवळचे नातेवाईक शेवटचे अंत्यदर्शन सुद्धा घेवू शकत नव्हते.

इतके मोठे शहर व तालुक्याचे ठिकाण आणि पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असून सुद्धा शहरात शवपेटी उपलब्ध नाही हे हेरून प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी मा. ना .बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शवपेटी उपलब्ध करून शहरासाठी लोकार्पण केली.
सदर शवपेटी आधार फाउंडेशन यांना समर्पित करून त्याची पुढील देखभाल व हाताळणी फाऊंडेशन करणार आहे.

शवपेटी लोकार्पण सोहळ्यात पं. स. उपसभापती संभाजी भोसले,माजी नगराध्यक्ष शशिकांत वाणी, उपनगराध्यक्ष आनंद शेठ जैन , माजी नगरसेवक योजनाताई पाटील, जग्गू भोई, मनोहर चौधरी ,संतोष महाजन,असीम मिर्झा, काँग्रेसचे दिलीप शेंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर निलेश पाटील,प्रहार सरचिटणीस देविदास महाजन, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी सह प्रहार चे व आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार