कर्नाटकमधील उडप्पी जिल्ह्यामधील शिरुर येथे एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी (२० जुलै) झालेल्या या अपघातामध्ये रुग्णवाहिका टोल नाक्यावरील गेटला धडकून रस्त्याच्या बाजूला पडल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
बंगळुरू :- रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना रुग्णवाहिकेला रस्ता करून देणं ही सर्वांचीच जबाबदारी असते. अनेकदा रुग्ण अत्यवस्थ असतात. त्यामुळे चालकांना रुग्णवाहिका वेगाने चालवावी लागते. मात्र वेगामुळे अनेकदा अपघातांची शक्यता निर्माण होते. दुर्दैवाने कर्नाटकमध्ये रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. (Ambulance Accident news in Marathi)
बयंदूरजवळील टोलनाक्यावर एक वेगवान रुग्णवाहिका धडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रुग्णवाहिका येतेय हे दिसताच टोलनाक्यावरील कर्मचारी बॅरिकेडस दूर करण्यासाठी धावतात. त्याचवेळी वेगाने येणारी रुग्णवाहिका टोलनाक्यावर येऊन धडकते. या जोरदार धडकेत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघातग्रस्त रुग्णवाहिका रुग्णाला होन्नावरा येथे घेऊन जात होती. रुग्णवाहिका टोलनाक्यावर आली असताना तिथं गाय बसलेली होती. गाय असल्यामुळे चालकाने वेगवान रुग्णवाहिका थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कदाचित रुग्णवाहिकेने टोलनाक्याला धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






