पाळधी : – जीपीएस मध्ये सर्व विद्यार्थिनी व शिक्षिकांना मिठाई वाटून नारिशक्तीचा अनोखा जल्लोष…
पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे देशाच्या सर्वोच्च घटनात्मकपदावर विराजमान झाल्याबद्दल महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा अनोखा जल्लोष पाहण्यात आला.
यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमंते तत्र देवता
या उक्तीनुसार एका सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातून येऊन, शिक्षिका या पदापासून देशाच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या द्रोपदी मुर्मू यांच्यासह सर्व नारीशक्तीचा गौरव सोहळा जीपीएस मध्ये करण्यात आला.
प्राचार्य श्री सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून सारे जहासे प्यारी मेरे भारत की बेटी हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींनी महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांची वेशभूषा परिधान केली. नारीशक्तीच्या कार्याचा गौरव म्हणून सर्व विद्यार्थिनींना व सर्व शिक्षिकांना मिठाई भरवून, त्यांचा कार्याच्या यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री राकेश धनगर सर यांनी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आरती पाटील, सोनी झवर, भागवता सोनवणे यांनी भावुक होत आपले मनोगत व्यक्त केले. आमच्या संस्थेला सर्व शिक्षिका, व इतर महिला कर्मचारीवृंद देत असलेले योगदान हे अतुलनीय आहे, या शब्दात प्राचार्य सचिन पाटील यांनी सर्व शिक्षिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक श्री. विक्रम पाटील सर,भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री सचिन पाटील सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






