जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Spread the love

सोयगाव,दि.२२..आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांचा सुधारित आरक्षण व सोडत कार्यक्रम जाहीर झाला असून दि.२८ जुलैला जिल्हा परिषदेच्या गटांसाठी जिल्हाधिकारी व पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार हे एकाच वेळी आरक्षण व सोडत काढतील असे आदेशात म्हटले आहे.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागांचा समावेश करण्यात आल्याने नव्याने सुधारित आरक्षण व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

आरक्षण व सोडत कार्यक्रमात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागासप्रवर्ग,व महिला(अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागासप्रवर्ग,व सर्वसाधारण या प्रवर्गांसाठी नव्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आरक्षण व सोडतीची सूचना दि.२६ जुलैला जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील दि.२८ जुलैला आरक्षण व सोडत काढण्यात येणार असून सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना दि.२९ जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल दि.२९ जुलै ते २ आगस्ट या कालावधीत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी कालावधी आहे.

प्राप्त झालेल्या हरकती व सूचनाचा विचार करून अंतिम आरक्षण दि,५ आगस्टला प्रसिद्ध करण्यात येईल.सोयगाव पंचायत समितीसाठी सहा गणांसाठी तहसीलदार रमेश जसवंत यांच्या हस्ते आरक्षण व सोडत दि.२८ जुलैला काढण्यात येईल असे निवडणूक विभागांचे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी सांगितले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार