मुंबई :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच मुंबई लोकल ट्रेन मुंबईकरांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. लोकल ट्रेनशिवाय मुंबईची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. पण याच लोकल ट्रेनचा प्रवास करताना अनेक अपघात घडतात. विशेषत: रेल्वे स्थानक परिसरात अपघात घडण्याच्या संख्येत बरीच वाढ दिसून येते. सध्या कांदिवली रेल्वे स्थानकावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. (a cctv video of accident at kandivali railway station in mumbai goes viral)
मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला चांगलच महागात पडलं आहे. कांदिवली फलटावर दोघेजण मस्ती करत जात होते. पण अचानक मित्रांसोबत मस्ती करताना एका मुलाचा रेल्वे रुळावरुन तोल गेला आणि त्याला लोकल ट्रेननी धडक दिली. हा संपुर्ण प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
सध्या या घटनेचा सीसीटिव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
मुंबईत लोकल ट्रेनच्या बाबतीत अशा घटना नवीन नाहीय. या आधीही अशा अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना किंवा रेल्वे स्थानक परिसरात वावरताना सावधगिरीने राहणे गरजेचे आहे
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






