शिवसेना कोणाची ? पुरावे सादर करण्याच्या आदेशावर; CM शिंदे म्हणाले, आमच्याकडे…

Spread the love

मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ((CM. Eknath shinde )यांनी 40 हून आमदार सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. आता शिवसेना पक्ष कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत असून याचे पुरावे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्हाला पुरावे सादर करण्याचे पत्र दिले आहे. आम्ही निवडणूक आयोगासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. आम्ही शिवसेना आहोत. आमचे 50 आमदार आहेत आणि लोकसभेत 2/3 सदस्य आमच्यासोबत आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. दुसरीकडे एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेतच असल्याचं सांगत शिवसैनिक आहोत हे म्हणत आहेत.

दुसरीकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहे. त्यामुळे ”दुध का दुध पाणी का पाणी”, होईल असंही सावंत यांनी म्हटलं.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार