समुद्रपूर (जि. वर्धा) : – सध्या महाराष्ट्रात मारहाण झाल्याच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच लग्नाला नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने प्रेयसीसह तिच्या भावाला भर रस्त्यात जबर मारहाण केली. जखमी बहीणभावास सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. कपिल आखाडे आणि त्याचा मित्र वैभव लाजूरकर (रा. हिंगणघाट) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा येथील मुलगी व तिचा भाऊ समुद्रपूर येथे एका महाविद्यालयात ११ जुलैला परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा आटोपल्यावर दोघेही दुचाकीने वर्ध्येकडे निघाले. दरम्यान, समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव चौरस्त्यापुढील वाघाडी नदीजवळ प्रियकर कपिल आखाडे आणि त्याचा मित्र वैभव लाजूरकर यांनी बहीणभावाची दुचाकी थांबविली. युवतीला ‘तू माझ्याशी लग्न का करीत नाही’ असे म्हणत मारायला लागला
भावालाही लोखंडी रॉडने मारहाण केली. गंभीर जखमी बहीणभावास रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, भावाचा मृत्यू झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांच्या सुपूर्द करण्यात आला होता. समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रश्नांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांनी आरोपीस अटक केली.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






