झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- शहरातील धरणगाव रस्त्यावरील भटू वामन चौधरी यांच्या राहते घर बंद असल्याचा फायदा घेऊन सोन्याचे वस्तू व मुद्देमाल असे एकूण ६० हजार मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे
शहरातील धरणगाव रस्त्यालगत असलेले ओम नगर प्लॉट नंबर ८७ येथे अनिता भटु चौधरी व त्यांचे पती भटू वामन चौधरी यांचे घर आहे.
त्यांना असलेले दोन मुलं यशवंत व गौरव हे भटू वामन चौधरी नोकरी निमित्त बाहेर गावी राहतात दिनांक११ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास सून जागृती हीस मुलगा गौरव यांच्या कडे सोडण्या साठी पुणे येथे गेलेल्या होत्या दिनांक २२ जुलै रोजीसकाळी आठ वाजता पुणे येथे मुलगा गौरव यांच्या कडे असताना एरंडोल येथील घराच्या शेजारी राहणाऱ्या छाया अरुण पाटील यांनी फोन द्वारे कळवले की तुमच्या घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजा तसेच आतील लाकडी दरवाजा असे दोघांचे कुलूप तुटलेले आहे व ते खाली पडले आहे
लागलीच मी व पुणे येथून मुलगा गौरव असून जागृती यांच्या सोबत एरंडोल येथे आले असता घर बाहेरून पाहिले दोन्ही दरवाजांचे कुलूप तुटलेले होते दोघे दरवाजे फोडून घरात प्रवेश केला असता घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटी तील सामानअवास्तवस्त पडलेले होते .तसेच लोखंडी कपाटातील ठेवलेले पैसे सोनाच्या दोन अंगठ्याच्या मिळून आले नाही
अज्ञात चोरट्यांनी सदरचा रोख खालील प्रकारच्या नोटा ५००,२००,१००, ५० ,२०, जवळपास ३००० रुपये किमतीचे अठरा ग्राम वजनाची सोन्याची चैन १५००० किमतीचे पाच ग्राम च्या दोन अंगठ्या असे एकूण जवळपास ६० हजार रुपयांचा मुद्देमालअज्ञात चोरट आणि लंपास केला आहे याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनलाअनिता भटू चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेडकॉन्स्टेबलअनिल पाटील तपास करीत आहे
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






